गेले द्यायचे राहुनी
गेले द्यायचे राहुनी, तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्या पास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने
आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र सोशी रक्त
आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्मळ्य, आणि पानांचा पाचोळा