का रे दुरावा
का रे दुरावा,
का रे अबोला
अपराध माझा
असा काय झाला
नीज येत नाही
मला एकटीला
कुणी ना विचारी
धरी हनुवटीला
मान वळविसी तू
वेगळ्या दिशेला
अपराध माझा
असा काय झाला
तुझ्यावाचुनी ही
रात जात नाही
जवळी जरा ये
हळू बोल काही
हात चांदण्याचा
घेई उशाला
अपराध माझा
असा काय झाला
रात जागवावी
असे आज वाटे
तृप्त झोप यावी
पहाटेपहाटे
नको जागणे हे
नको स्वप्नमाला
अपराध माझा
असा काय झाला
का रे दुरावा,
का रे अबोला