Skip to main content
  1. Kavita/

प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला

स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटूनी तू घेतला

जाग धुंदीतूनी मजसी ये जेधवा
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला